पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार धनाजीराव थोरात यांना मिळाला.
(निलेश गायकवाड)
सदर पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकर, शशिकांत तरंगे उपस्थित होते.
धनाजीराव थोरात हे धनगर समाजाचे कुलदैवत बाबीर देवस्थान ट्रस्टचे सचिव आहेत. धनाजी थोरात यांनी धनगर समाजातील बांधवांसाठी राष्ट्रीय व सामाजिक विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा राज्यस्तरीय पुरस्कार बारामती येथील कार्यक्रमात नुकताच देण्यात आला.
यापुढील काळातही महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करत राहणार असल्याचे धनाजी थोरात यांनी यावेळी सांगितले.