November 21, 2024 10:19 pm

प्रताप’ कॉलेज मध्ये हर घर तिरंगा अभियान संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप’ कॉलेज मध्ये हर घर तिरंगा अभियान संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव.

क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या १२ ऑगस्ट २०२४ च्या पत्रानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत.त्या नुसार राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी हर घर तिरंगा अभियान 2024 अंतर्गत प्रभात फेरीचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात २५० पेक्षा अधिक विद्यार्थी उपथित होते.

याप्रसंगी  शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानानुसार प्रत्येकाने आपल्या घरासमोर तिरंगा लावावा व सर्वांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.अरुण बी जैन यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे सह सचिव तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव व प्रा.डॉ.संदिप नेरकर याचप्रमाणे प्रा.योगेश पाटिल , प्रा. वैशाली महाजन, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा. डॉ.प्रमोद चौधरी, क्रीडा संचालक प्रा.सचिन पाटील, प्रा.डॉ.सुनिल राजपूत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना, एन सी सी, क्रीडा, विभागातील विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी साठी प्रा. डॉ.सचिन नांद्रे (संचालक सेवा योजना) यांनी मार्गदर्शन केले.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्षय सीए नीरज अग्रवाल,कुलसचिव राकेश निळे,भटू चौधरी,देवेंद्र कांबळे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ .हेमंत पवार यांनी केले तर महिला का कार्यक्रम अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!