मंत्री अनिल पाटलांचा एकच ध्यास महत्वाची पदे घरातच ठेवून साध्यं होणार का तालुक्याचा विकास..
विक्की जाधव मार्मिक समाचार.
मंत्री आणि आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांनी सर्वच ठिकाणी मी लाभार्थी म्हणून महत्वाची पदे आपलीकडे घेतली तर आम्ही पदाचे लाभार्थी परंतु जनता आणि कार्यकर्त्यांनी सतरंजीचं उचलावी. हें कितपत योग्य..
एकीकडे आपण पक्षाचे लाभार्थी होत आहेत तर दुसरीकडे आपले असंख्य राष्ट्रवादी अजित पवार गट कार्यकर्त्यांनी आपल्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली हें जनतेस पडलेले कोडे आपण सोडू शकाल का.. नक्कीच नाही.
तर १२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमळनेर येथे येणार असल्याची चर्चा सुरू असून
आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशा जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडीत नवनवीन ट्विस्ट तालुक्यातील जनतेस बघावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालीनां वेग आला असुन विशेषतः अमळनेर तालुक्याच्या राजकारणावर मंत्री अनिल पाटील यांचा पराभवासाठी मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांचे लक्ष लागून आहे. मागील काही काळात शरद पवार यांनी असे म्हटले होते की येणाऱ्या पुढील विधानसभेत अनिल पाटील दिसणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ.
तर अमळनेर येत्या १२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विशेषतःह अमळनेरला भेट देण्यासाठी येणार असून काही आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
यावेळी अजितदादांसमोर स्थानिक नेत्यांचे उणे – तुने निघतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
क्रमश :