अतिशय प्रामाणिक आणि पोलीस सेवेला वाहून घेणाऱ्या रवींद्र हाकेचा अपघाती मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा
(निलेश गायकवाड)
प्रत्येक मुलगा आपल्या मनात एकच स्वप्न उराशी बाळगतो , ते म्हणजे स्वत:हा पोलीस बनवण्याचे,अधिकारी म्हणून काम करण्याचे.आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे . काहीही झालं तरी हे स्वप्न पूर्ण करायचेच, असं ठरवलं आणि ते प्रत्यक्षातही आणलं ते मदनवाडी येथील रवींद्र हाके याने.रवींद्र पोलीस झाला म्हणून गावाने त्याचा सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या आनंद साजरा केला.इंदापूर तालुक्यातील मदनवाडी या गावातील रवींद्र हाके याची ही खरंतडं प्रवासातून अधिकारी झालेली वाटचाल युवकांना प्रेरणा देणारी होती . पण नियतीला काही वेगळेच करायचे होते…. नव्हत्याचे होते झाले आणि क्षणात कानावर बातमी येताच गावकरी सुन्न झाले…सध्या मदनवाडी गावचे सुपुत्र आणि मुबई पोलीस दलात नोकरी करणाऱ्या रवींद्र हाकेचा विक्रोळी कांजुरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान अपघातात मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
होमगार्डची सेवा बजावीत असताना पोलीस भरती होवून मुंबई येथे सेवा बजाविणाऱ्या तरुण पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार रवींद्र बाळासाहेब हाके वय २८ पोलीस कॉन्ष्टेबल बक्कल नंबर ३१९ नेमणूक एलए १ मुंबई शहर रा .मदनवाडी ता.इंदापूर यांचे रेल्वे अपघातात निधन झालेले आहे. सेवा बजावीत असतानाच पोलीस जवान रवींद्र यांचा हा मृत्यू झाला आहे.३ वर्षापूर्वी होमगार्ड ची सेवा बजावीत असताना रवींद्र हा पोलीस भरती झाला आणि मुंबई येथे तो सेवा बजावीत होता.तर रवींद्रचा छोटा भाऊ तुषार हा हि वर्षभरापूर्वी पोलीस भरती झाला असून तो जालना येथे ट्रेनिंग पूर्ण करीत आहे.साधारणपणे वर्षभरापूर्वीच रवींद्रचे लग्न होवून आठवड्यापूवी त्याला मुलगा झाला होता.त्याचा आनंद व्यक्त करून बुधवारी परत पोलीस सेवेत हजर झाला होता.अतिशय प्रामाणिक आणि पोलीस सेवेला वाहून घेणाऱ्या रवींद्रचा अपघाती मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.