बाळासाहेब हे कट्टर काँग्रेस विरोधी होते असा भ्रम पसरवला जातो. ते कधीच काँग्रेस सोबत गेले नसते असे भाजपकडून पसरवले जाते. पण तुम्हाला माहित आहे का कि….
– शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा काँग्रेसचे पुढे उपमुख्यमंत्री राहिलेले रामराव आदिक उपस्थित होते.
– मार्मिकचे प्रकाशन काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.
– 1974 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत मध्य मुंबईतून रामराव आदिक काँग्रेस उमेदवार म्हणून उभे होते. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
– 1975 च्या आणीबाणीला काँग्रेसच्या इंदिरा गाँधी यांना बाळासाहेब यांनी पाठिंबा दिला होता.
– 1977 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांनाच महापौरपदासाठी पाठिंबा दिला.
– 1977 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला.
– 1980 मध्ये बाळासाहेबांनी आपले मित्र असलेल्या कांग्रेसच्या अंतुले यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला.
– 1982 मध्ये शरद पवार व जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित होते.
– 2007 मध्ये भाजप विरुद्ध जाऊन काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने साथ दिली होती.
– 2012 मध्ये भाजप विरुद्ध जाऊन काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने साथ दिली होती.
देशहितासाठी आणि महाराष्ट्रधर्मासाठी अनेकवेळा शिवसेना काँग्रेस एकत्र आले आहेत. म्हणजे बाळासाहेब यांनी हिंदुत्वाशी तडजोड केली असे होत नाही. तसेच उद्धवसाहेबांनी देखील केली नाही. पण खोट नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करण्यात हल्ली राजकीय लोक धन्यता मानतात. कोणाचा अंधभक्त नाही, देशभक्त बनूया.