January 31, 2025 5:16 am

संविधानाच्या रक्षणासाठी दक्ष राहा; जागतिक आदिवासी दिन महोत्सवात – वक्ते जगदीश ओहोळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

संविधानाच्या रक्षणासाठी दक्ष राहा; जागतिक आदिवासी दिन महोत्सवात – वक्ते जगदीश ओहोळ

पुणे (दौंड प्रतिनिधी) –
विकी ओहोळ
दि. 9 ऑगस्ट रोजी अखिल पुणे जिल्हा व शहर आदिवासी समाज यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी
‘आदिवासी समाज, आजची स्थिती व आव्हाने’ याविषयावर भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित कार्यक्रमात वक्ते जगदीश ओहोळ यांनी मार्गदर्शन केले. भाषणावेळी अनेकदा टाळ्या व घोषणांचा निनाद होत होता. आदिवासी हा वनवासी नव्हे तर इथला मूळनिवासी आहे. आदिवासींना भारताच्या संविधानाने इतरांपेक्षा विशेष अधिकार व हक्क दिले आहेत. त्यांचा वापर करून आदिवासी बांधवांनी मुख्य प्रवाहात येणे व शासनकर्ता होणे गरजेचे आहे. आज संविधान व संविधानिक हक्कांसाठी लढाईची गरज आहे. आपण सर्वांनी आता, आपले रक्षण करणाऱ्या संविधानाचे रक्षण करण्याची वेळ आली आहे. अशी भूमिका यावेळी वक्ते जगदीश ओहोळ यांनी मांडली.
यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे, पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त राजीव नंदकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहायकक आयुक्त मुकेश कोळप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहायकक आयुक्त श्रीनिवास दांगट, यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!