माजी आमदार कृषी भूषण साहेबराव धोंडू पाटील 9 ऑगस्ट क्रांती दिन रोजी घेणार होतें पत्रकार परिषद.
अमळनेर : विक्की जाधव.
मागील काही दिवसात मुंग गिळून बसलेले तालुक्याचे लाडके माजी आमदार साहेबराव दादा एक पाऊल पुढे यां नाही तर मागे. अश्या अशयाची बातमीत मार्मिक ने प्रसिद्ध केली होती. तद्दनंतर अमळनेर तालुक्यात राजकीय चर्चानां उधाण आले होतें.
काहीनी फोटो व्हायरल करून आपली राजकीय पोळी भाजली तर माजी आमदारांना आजीबाईच्या मागे लपावे लागले होतें. हें चित्र संपूर्ण अमळनेर तालुक्यातील जनतेने बघिले होतें. यात निव्वळ कृषीभूषण यांची प्रतिमा खराब करणे हाच उद्देश होता काय??
कृषिभूषण पाटील पत्रकार परिषद घेणार होते परंतु नुकतीच अजितदादा यांच्या जळगाव जिल्हा दौरा लागला असून अमळनेरात ते येणार आहेत अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कृषी भूषण पाटलांनी पत्रकार परिषदेला स्थगिती दिली आहे.
कृषिभूषण आमदार असतांना अजित दादा यांनी भरमसाठ निधी हा अमळनेर तालुक्याला दिला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर त्यांच्याशी चर्चा करून मग पत्रकार परिषद घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. यावेळी अजित पवार कृषीभूषण यांच्याकडे चहापान घेतील. तर कृषी भूषण साहेबराव पाटलांची पुढची रणनीती काय आहे याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
क्रमश :