‘कवितेच्या ‘ माध्यमातून मराठी भाषा सवर्धन जनजागृती….
बारामती (प्रतिनीधी : वर्षा चव्हाण)
दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी आठ फाटा बारामती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पंचक्रोशी साहित्य कट्टा वतीने कवी भेट व धमाल, गाणी ,गप्पा-गोष्टी या उपक्रमासाठी परिसरातील नामांकित कवयित्री हभप .शुभांगी जाधव तसेच कवी सोमनाथ सुतार यांची विशेष मुलाखत कार्यक्रम पार पडला.
मराठी शाळेमध्ये अनेक नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात त्यातूनच एक उपक्रम म्हणजे मराठी भाषा संवर्धनासाठी आपल्या बोली भाषेतून रचलेले काव्य यावर मार्गदर्शन तसेच बाल गोपलांना मनोरंजन मधून अभ्यासाची गोडी लागावी. हास्य करणारे बडबड गीत सादर करताना मुलांना त्यात स्वतः सहभागी करून घेणं अशाप्रकारे
हभप शुभांगी जाधव यांनी आपल्या बडबड गीतांमधून तसेच कवितांमधून मुलांशी संवाद साधला. कोड्यामधले गणित प्रश्न विचारून मुलांना मार्गदर्शन केले,त्याचबरोबर कवी सोमनाथ सुतार यांनी आपल्या शेतीमातीमधील वास्तव कविता सादर केल्या.कविता कशी जन्माला येते याबद्दल सरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आठ फाटा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक लडकत सर ,हभप सोमनाथ जाधव, शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम सातपुते मॅडम यांनी केले……