June 28, 2025 11:45 pm

अमळनेर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी केला सन्मानपूर्वक सत्कार.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी केला सन्मानपूर्वक सत्कार.

अमळनेर विक्की जाधव.

काल दि. ६ रोजी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी साहेब अमळनेर येथे आले होते. त्यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध प्रकारच्या गंभीर  गुन्ह्यांचा गतीने तपास करणारे तसेच आरोपीचा तपास घेऊन तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले तर काही कर्मचाऱ्यांनी गोपनीयतेच्यां कार्यात कोणतीही कसर न करता आपल्या पदाची कसून कार्यपद्दती हाताळल्या बद्दल पोलीस कर्मचाऱ्यांना शाबासकी देत केला सत्कार. यात  हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस नाईक सिद्धांत शिसोदे यांना बक्षीस देऊन सन्मान केला. पोलीस हेडकॉस्टेबल किशोर पाटील, संदीप धनगर, राहुल चव्हाण यांचाही सन्मान केला. हेडकॉन्स्टेबल हर्षल पाटील, चंद्रकांत पाटील, शेखर साळुंखे, अमोल पाटील एमपीडीए चा कायदेशीर प्रस्ताव तयार केला म्हणून बऱ्याच गुन्हेगारांवर योग्य कारवाई झाली तर , योगेश सोनवणे यांचाही रोख बक्षीस देऊन सन्मान केला. यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर उपस्थित होते.  यावेळी तें बोलतांना म्हटले कीं सामान्य जनतेला न्याय द्या आणि आपले कार्य अचूक पारपाडा अशा सूचना ही दिल्या. आगामी सण उत्सव आणि विधानसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था राखू अश्या सूचना दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!