पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी कार्यतत्परता दाखवत सुरू केलेल्या मोहिमेस अमळनेर शहरवासीय सुजाण नागरिक यांच्याकडून कौतुक
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील शाळा कॉलेजच्या मुली सुरक्षित नाहीत रोडरोमिओचां बंदोबस्त करा अशा आशयाची बातमी मार्मिकने नुकतीच प्रसिद्ध केली होती.
मार्मिक समाचारच्या बातमीची दखल घेत अमळनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांनी पोलीस डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावून कर्तव्यदक्षता दाखवून दिली.
शहरात विविध ठिकाणी शाळा कॉलेज परिसरात मुलींना त्रास होईल असे वर्तन करण्याच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. या कारणांमुळे अनेक विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होतें.
समाजात इज्जत जाईल ह्या भीतीने तक्रार करायला कोणीतीही मुलगी पुढे येत नाही. तरी पोलीस विभागाचा माध्यमातून अश्या टारगट, विकृत, टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनने कठोर पाऊले उचलली असून विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण निर्माण झाले आहे. अमळनेर पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेस अमळनेर शहरवासीय सुजाण नागरिक यांच्याकडून कौतुक होताना दिसत आहे.