दौंड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनीधी – विकी ओहोळ
८४४६११९१५८
दौंड – लोकशाहीर,साहीत्यरत्न, डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती दौंड शहरात मोठ्या जल्लोषात साजरी झाली. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समिती दौंड, मातंग समाज एकीकरण समिती दौंड शहर व तालुका तसेच दौंड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी , विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी
जयंती उत्सव समितीने उत्सवाचे आयोजन केले. तसेच युवा पिढीतील लहुजी यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष नितीन तूपसौंदर्य यांच्या संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जयंती उत्सव साजरा केला जयंतीनिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली होती. दरम्यान काही काळ वीज पुरवठा खंडीत असतानाही जयंती उत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता अगदी शिस्तबध्द पद्धतीने पार पाडण्यात सर्व संघटनांनी योग्य ती काळजी घेतली.