करमाळा : आसाम मधील माजुली जिल्ह्यात सप्तक इंटरनॅशनल या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय संगम महोत्सवात सुर ताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना मानाचा समजला जाणारा “संगम सुर सरस्वती अवार्ड” संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हलीराम बोराह आणि मोन बोराह यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. माजूली हे जगातील एकमेव असणारे रिव्हर आयर्लंड आहे. या महोत्सवाचे वर्षातून एकच वेळा तिथे आयोजन केले जाते.
या महोत्सवात बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशातील कलाकार उपस्थित रहात असतात. करमाळा येथून सुर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने सतिश वीर , सुनिता वीर, सुरेश चाळक, अक्षरा चाळक, आदिती मिसाळ, अनुजा करपे, शुभांगी महाडिक, ऍड. सुनील जोशी ,शारदा जोशी, आर्यन अडसूळ, निखिल वाघमारे, ओंकार पवार, परशुराम साने , हनुमंत सूर्यवंशी , दत्तू नलवडे आणि संस्थेच्या सचिव शिवकन्या नरारे इत्यादीं पंधरा जनांनी सहभाग नोंदवला. इंटरनॅशनल च्या वतीने या सर्व सहभागी जणांचा सन्मान करण्यात आला.