कर्नाटक येथून ताब्यात घेतच दाऊद शेखने दिली गुन्ह्यांची कबुली
मार्मिक न्यूज नेटवर्क.
उरण येथील २० वर्षीय तरुणीच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने कर्नाटक येथून ताब्यात घेतलं आहे. तिथे त्याने प्राथमिक तपासात गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली आहे. तसेच, त्याला नवी मुंबईत आणल्यानंतर सखोल चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
२७ तारखेला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज घटनेचा पाचवा दिवस आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी डीसीपी क्राइम आणि डीसीपी झोन २ सीपींच्या मार्गदर्शनाखाली ८-९ पथकं काम करत होते. आम्हाला नातेवाईक, मित्रपरिवार, स्थानिकांच्या चौकशीत आणि तांत्रिक तपासणीतून जे समोर आलं त्यानुसार दोन तीन जणांवर संशय होता. त्यानुसार पोलिसांचं पथक नवी मुंबई आणि कर्नाटकात पाठवलं होतं. दोन पथकं कर्नाटकात थांबलेलं होतं. आम्ही त्यांना इथून इनपूट देत होतो. त्याआधारे काल सकाळी दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आलं, असं दीपक साकोरे यांनी सांगितलं.
घटना घडल्यानंतर त्याचं लोकेशन सापडत नव्हतं, तो कर्नाटकचा आहे इतकीच माहिती आमच्याकडे होती. त्याच्या मित्राने माहिती दिली आणि त्याआधारे कर्नाटकातील शहापुरातील अलधल या गावातून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणात मोहसिनला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. तो मृत तरुणीत्या संपर्कात असल्याने संशयाच्या फेऱ्यात होता. पण, मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दाऊदला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही संशयित सध्या नाही, असंही अतिरिक्त पोलिस आय़ुक्तांनी सांगितलं.