साहेब सांगा निवेदन तरी किती वेळा द्यायचे,अन वेळा सांगायच.
मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा.- बहुजन समाज पार्टी दौंड.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौंड शहरात ठिकठिकाणी अनेक चौकात मोठया प्रमाणात मोकाट जनावरे,कुत्री फिरत आहेत. या जनावरांना कोणीही वाली वारीस नसल्याने त्यांना त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी इतरत्र फिरावे लागते. त्यांच्या या दौंड शहरातील होत असलेल्या भटकंतीने अनेक वेळा शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तर कधी कधी अपघातही होतात, किंवा एखादी गाई ,बैल किंवा श्वान रस्त्याने जाणार्या नागरिकाला अचानकपणे अंगावर येतात. त्यामुळे आपण या मुक्या जनावरांच्या विषयी योग्य तो विचार करून दौंड शहरातील नागरीकांच्या चांगल्या भविष्याचा गांभीयनि विचार करून आपण मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
सदर अर्जाची, निवेदनाची दखल न घेतल्यास आपल्या विरोधात कायदेशीर आंदोलन छेडण्यात येईल याची असा इशारा यावेळी बहुजन समाज पार्टी दौंड यांचेकडून नगरपरिषद, दौड यांना देण्यात आले.