वसुंधरा दिनाचे’ औचित्य साधून भिगवन शहरांमध्ये भिगवन रोटरी क्लब च्या वतीने वृक्ष दिंडीचे आयोजन
(निलेश गायकवाड)
‘वसुंधरा दिनाचे’ औचित्य साधून भिगवन शहरांमध्ये भिगवन रोटरी क्लब,बारामती रोटरी क्लब, भिगवन ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष दिंडी काढून जनजागृती करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद शाळा येथून वृक्ष दिंडी चे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण शहरांमध्ये वृक्ष दिंडी व जागृती करण्यात आली माझं झाड माझं बाळ ही संकल्पना वसंतराव मालुंजकर यांनी आपल्या भाषणातून मांडली.व्हीं पी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर पाटील सर यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले. रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सवाने यांनी इथून पुढे शाळेमध्ये असेच प्रकल्प राबवू असे सांगितले.
यावेळी भिगवन गावचे सरपंच
दीपिका क्षीरसागर, दत्ता बोराटे रविकिरण खारतोडे,उपसरपंच जावेद शेख यांच्या उपस्थितीत शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धां यात विजय झालेल्या सर्व स्पर्धकांना रोटरी क्लब भिगवन च्या वतीने मेडल देण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन किरण रायसोनी,धरणेंद्र गांधी, संस्थापक अध्यक्ष रोटरी क्लब सचिन बोगावात, शिव फाउंडेशन अध्यक्ष संपत बंडगर, तुषार क्षीरसागर,माजी अध्यक्ष रोटरी डॉक्टर अमोल खानावरे, रोटरी उपाध्यक्ष निखिल बोगावत, खजिनदार कुलदीप ननवरे ,प्रवीण वाघ,अतुल वाघ,दिनेश कोहिनूर आदिजन.