June 29, 2025 5:06 am

आठवडाभरापासून नागरिकांना मिळेना रेशन, ई-पॉस मशीनचे सर्व्हर बंद; ग्राहकांना होतोय मनस्ताप.

अपनी भाषा में पढ़े! Translate

आठवडाभरापासून नागरिकांना मिळेना रेशन, ई-पॉस मशीनचे सर्व्हर बंद; ग्राहकांना होतोय मनस्ताप.
धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांत होताहेत वाद.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड- स्वस्त धान्य योजनेतील धान्य ग्राहकांना देण्यासाठी वापरण्यात येणारे ई-पॉस मशीनचे सर्व्हर तांत्रिक समस्येमुळे आठवडाभरापासून बंद आहे. त्यामुळे अनेक भागातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
धान्य वितरणासाठी आवश्यक असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये सर्व्हर डाऊनमुळे अडचणी येत आहेत. अनेक वेळा स्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांत वाद होतात.
स्वस्त धान्य योजनेचे लाभार्थी ग्राहकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर थंब द्यावा लागत आहे. परंतु, आठवडाभरापासून सर्व्हरच डाऊन असल्याने ग्राहकांना दुकानात चकर माराव्या लागत आहेत. ई-पॉस मशीनला सर्व्हरमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे धान्याचे वितरण बऱ्याच ठिकाणी थांबले आहे. यामुळे धान्य वितरण व्यवस्था त्वरित सुरळीत करावी व शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!