कृष्णाई वर झालेली सेंटलमेंट नालंदा ला होणार होती..??
अमळनेर : विक्की जाधव मार्मिक स्पेशल रिपोर्ट
मी तिकीट घेण्यासाठी इच्छुक तर आहेचं पण सद्या शांततेच्या भूमिकेत राहून अमळनेर शहरात विधानसभेचा वनवा तर पेटवणार नाहीत ना? कृषिभूषण साहेबराव दादा एक पाऊल मागे या नाहीतर पुढे अशी बातमी मार्मिक ने प्रसिद्ध केली होती. आणि तें खरे ही ठरले.
विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना अमळनेर विधानसभा
मतदारसंघात काही ही होवो आमदार पुन्हा मीच झालो पाहिजे असा आठ्ठाहास पुन्हा आमदार होऊ इच्छुक असणाऱ्या दादांना अमळनेरकर जनता चं दाखवणार जागा. फक्त पैसा म्हणजे निवडणुकीचे समीकरण नसुन अमळनेरची जनता हुशार असुन आता राजकीय सर्वे समीकरण मोडणार.
अमळनेर मतदारसंघात आमदार कसा कसावा आणि कोण आमदार होईल हा कौल अमळनेरकर जनता दाखवणार तत्पूर्वी काहींचे लाईट लागले असुन यां संदर्भात बंद दाराआड बैठका सुरु झाल्या असुन काही उमेदवरांच्या मनात धडकी भरली आहे. डीवायडेशनचे समीकरण होऊन याचा फायदा माजी आमदार शिरीष चौधरी यांना तर होणार नाही. म्हणूनचं
अचानक अजित दादा यांना सोडचिट्टी देऊन जयंत पाटील यांच्या सोबत जवळीक साधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून साहेबरावं दादा निवडणुक लढवतील असे सुरु अमळनेर तालुक्यात सुरु होते तेव्हड्यातंच जाणतेला आणि कार्यकर्ते यांना अंधारात ठेऊन कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी धुळे येथील हॉटेल नालंदा येथे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात सेटलमेंट केल्याचे वृत्त काहींच्या हाती लागताचं तिथं न होता ही सेटलमेंट हॉटेल कृष्णई येथे घडवून आणली.
तर माजी आमदार कृषीभूषण साहेबराव दादा पाटील यांनी ठरल्याप्रमाणे नगरपालिका मी ठेवेल आणि विधानसभेसाठी विद्यमान मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांनी लढावे असे ठरवले असून कृषिभूषण साहेबराव पाटील खोक्यांमध्ये ओके झाले का असा प्रश्न अमळनेरांना पडलाय.
असे खरे असेल तर कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या जवळचा एक कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा कार्यकर्त्याने एका व्हाट्सअप ग्रुप वर पुढार्यांना शिव्या घातल्या…
मागील काही दिवसात आठ नगरसेवकांच्या मध्यस्थी भेटीनंतर ह्या घडामोडीना वेग आला असुन. येत्या ९ ऑगस्ट ला कृषिभूषण साहेबराव पाटील पत्रकार परिषदेत आपली काय भूमिका मांडतील याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
मागील काही दिवसात मी कार्यकर्ता म्हणून राहणार अशा भूमिकेत राहून अचानक अजित दादा यांना सोडचिट्टी देऊन जयंत पाटील यांच्या सोबत जवळीक साधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून साहेबरावं दादा निवडणुक लढवतील असे चित्र अमळनेर तालुक्यात सुरु होते. परंतु रविवारी झालेल्या या भेटीने तालुक्यात चर्चा ला उदान आले असून. साहेबराव दादांनी खरच अशी बैठक केली का?? केली साहेबराव दादा यांचे मनात होती का भीती?? की खोक्यांसाठी ओके म्हणून कार्यक्रमाची आखली होती रणनीती..