हातावर पोट भरणाऱ्यां छोट्या व्यवसायिकांच्या गाड्यांवर पालिकेचा हातोडा.
अमळनेर : विक्की जाधव.
मोकाट गुरे आणि शहरातील वाढते बेशिस्त कंट्राक्शन अतिक्रमण यावर पालिका आळा घालणार का?
असा प्रश्न जनसामान्यांतून येत आहे. सद्या नगर पालीकेने रस्त्यावर लोटगड्या लावून हतावर पोट भरणाऱ्यां सामान्यां व्यावसायिकांना अतिक्रमण लोटगाड्या धारकांवर दंडुका उगारला असुन पालिकेचे अतिक्रमण पथकप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अमळनेर शहरात बेशिस्त पार्किंग व अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी झाली आहे अशा अश्याची बातमी मार्मिक ने प्रसिद्ध केली होती यां संदर्भात धडक कारवाई ही झाली.
मागील तीन दिवसांत धुळे रस्ता, प्रांत कार्यालय ते तिरंगा चौक दरम्यान धडक कारवाईचे शहरातून स्वागत केले जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून बेशिस्त वाहन पार्किंग आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनांनी सामान्यां जनतेला वेठीस धरले होते. यामुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले होते. कायद्याचा धाक उरलेला नव्हता त्याला आळा बसला आहे. शहरातील विविध भागांत ३९ वाहनांवर पोलिसांनी धडक मोहीम रबावली असू सर्वत्र पोलिसांचे अभिनंदन होत आहे.