June 29, 2025 8:14 am

थकबाकीदारांना न्यायालयाचा धाक दाखून जुलमीकर वसुल करणाऱ्या न. पा. विरोधात पंकज चौधरी जाणार न्यायालयात. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

थकबाकीदारांना न्यायालयाचा धाक दाखून जुलमीकर वसुल करणाऱ्या न. पा. विरोधात पंकज चौधरी जाणार न्यायालयात. 

 

अमळनेर :विक्की जाधव 

वाटाघाटी करून, तडजोड करण्यासाठी थकबाकीदारांना दिली होती नोटीस..

नुकतीच झालेल्या लोक अदालतीत अमळनेर नगर परिषदेचे काही प्रकरणे निकाली निघण्यांच्या मार्गांवर होते. येथे नगरपरिषदे ने शहरातील 96 थकबाकी दाराना लोकअदालती मध्ये सदर प्रकरणाची वाटाघाटी करण्यासाठी बोलावलेले होते. परंतु काही नागरिकांना तिथे काहीच कळत नसल्याने तें सैरावैरा फिरत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक पंकज चौधरी यांना काही लोकांनी कॉल केला असता तें स्वतः तिथे गेले तर सर्व प्रकाराचे अवलोकन केले तर नगरपरिषदेने लोकांना वाटाघाटी करून तडजोड करण्या साठी उपस्थित राहण्या साठी नोटीस दिली होती. परंतु कुठलीच तडजोड नगरपरिषद करायला तयार नव्हती म्हणजे एक प्रकारे जनतेला न्यायालयाचा धाक दाखवत तेथे बोलवून घ्यायचे आणि आम्ही थकबाकी भरण्यासाठी नागरिकांना भाग पाडत आहे. अश्या पद्धतीने लोका कडून अमळनेर नगरपरिषद वसुली करत आहे.अमळनेर नगरपरिषद हा जाहील प्रकारे ही कर वसुली करीत असुन आज 96 लोकांना बोलावले आहे पुढे आणखी ही संख्या वाढणार आहे. हा प्रश्न अतिशय गंभीर असुन लोकांनी जागृत व्हायला हवं लवकरचं या संदर्भात नगरपरिषदे समोर लोक आंदोलन उभारुन यां जुलमी मानसिकतेला हानून पाडू न्यायालयाचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमळनेर न पा विरोधात मी स्वतः या बाबत लवकरच न्यायालयात जाणार आहे असे पंकज चौधरी यांनी मार्मिकशी बोलतांना सांगितले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!