अहो सांगायचं तर किती वेळा, आणि द्यायची तरी किती निवेदन; भरणे आणि पाटील यांच्या तालुक्यातील भिगवण ची आरोग्या सुविधा धुळखात;नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
(निलेश गायकवाड)
कोट्यावधी रुपये खर्चून धुळखात पडलेला भिगवण ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याबाबत अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने भिगवणकर नागरिकांच्या वतीने या ट्रामा सेंटरमध्ये सर्व सोयी सुविधा पुरविण्यास रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी आज दि. 27 रोजी शनिवारी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले.
चार वर्षांपूर्वी जवळपास 17 कोटी रुपये खर्चून ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णाची भव्य इमारत उभारण्यात आली. मात्र या रुग्णालयात बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव आहे तसेच डॉक्टर व कर्मचारी अशी 15हून अधिक पदे रिक्त आहेत.यामध्ये वर्ग दोन चे वैद्यकीय अधिकारी,सहाय्यक निरीक्षक, औषध निर्मिती अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, अधिपरीचिका कक्ष,सेवक आदीपदांचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्याचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तालुक्यातील भिगवण हे गावातील आरोग्याची दयनीय अवस्था. सत्ताधारी असणारे दोन्ही नेते असून देखील नागरिक विचारात आहेत नेमकं घोडं कुठे पेंड खाताय…? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
या ट्रॉमा सेंटर मधील उपलब्ध रुग्णवाहिका,जनरेटर,एक्स-रे मशीन बंद असल्याचा आरोप यावेळी आंदोलक रणजित जाधव यांनी केला. कोट्यावधी रुपये खर्चून देखील येथील ट्रामा सेंटरचा कारभार साधारण प्राथमिक रुग्णालय प्रमाणे सुरू आहे.त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे मत आंदोलक यांनी केले.तसेच अनेक सामाजिक राजकीय संघटना तसेच नागरिकांनी पाठपुरावा केला मात्र तरी वरिष्ठ अधिकार्यांकडून याकडे कानाडोळा केला जात आहे.
गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातून मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा पुढे हा श्रीनाथ चौक जाणता राजा विघ्नहर्ता चौक मराठी शाळा मार्गे ट्रामा केअर सेंटर येथे नेण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे ,पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी चोख बंदोबस्त राखला होता.
यावेळी भिगवण गावच्या सरपंच दीपिका क्षीरसागर ,तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष विक्रम शेलार , मराठा महासंघाचे पांडुरंग जगताप ,माजी पंचायत समिती सभापती संजय देहाडे ,भिगवण मेडिकल असोसिएशनचे डॉ.संकेत मोरे ,जेष्ठ समाजसेवक अशोक शिंदे ,रणजीत जाधव ,शरद चितारे ,भूषण काळे यांनी आपल्या भाषणात अपुऱ्या सुविधा बाबत आपले म्हणणे मांडले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागनाथ एम्पल्ले आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी डॉ.सचिन विभूते यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य होणार असल्याचे सांगितले.तर ट्रामा केअर सेंटर लवकरच पूर्ण सुविधांसह सुरु व्हावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.