June 29, 2025 5:44 pm

मुंग गिळून बसलेले कृषिभूषण साहेबराव दादा एक पाऊल मागे यां नाही तर पुढे. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंग गिळून बसलेले कृषिभूषण साहेबराव दादा एक पाऊल मागे यां नाही तर पुढे. 

अमळनेर: विक्की जाधव.

मुंग गिळून बसलेले कृषिभूषण साहेबराव दादा एक पाऊल मागे यां नाही तर पुढे येत्या विधनसभेसाठी आपली भूमिका निश्चित करा अमळनेरकरांना संभ्रमात ठेऊ नका. 

बऱ्याच दिवसापासून गायब झालेले कृषिभूषण दादा. माझे अजित दादा, माझे अजित दादा म्हणणारे आमचे साहेबराव दादा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेले दिसून येत आहे तर मी तिकीट घेण्यासाठी इच्छुक तर आहेचं पण सद्या शांततेच्या भूमिकेत राहून पक्षाचे नुकसान तर करणार नाहीत ना? मी कार्यकर्ता म्हणून राहणार अशा भूमिकेत राहून अचानक अजित दादा यांना सोडचिट्टी देऊन जयंत पाटील यांच्या सोबत जवळीक साधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून साहेबरावं दादा निवडणुक लढवतील असे सुर सद्या अमळनेर तालुक्यात सुरु आहेत. ह्या साहेबराव दादांच्या आता राजवड, अमळनेर, नाशिक आणि बारामती, मुंबई वाऱ्या सुरू झाल्या असून साहेबराव दादा मी सक्रिय झालो असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

परंतु काल परवा मुंबई येथील दादाची वारी निष्फळ ठरली असे काही जानकरांनी मार्मिकशी बोलतांना सांगितलं तर मी अजित दादा यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असे म्हणणारे साहेबरावं दादाची एकनिष्ठा कुठे?

नगरपालिका वाचवण्यासाठी भाजपाशी जवळीक साधणारे कृषिभूषण साहेबराव दादा मध्यंतरी गायब झाले आणि जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हापदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याला अचानक हजेरी लावून जयंत दादा यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत तर जयंत दादा यांच्या माध्यमातून आपल्याला तिकीट मिळणारचं असे अमळनेर तालुक्यात वातावरण निर्माण करण्यात कृषिभूषण यशस्वी ठरले.

सध्या नगरपालिकेशी करत असलेल्या पत्रव्यवहार सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जणु कृषिभूषण साहेबराव दादाचां कळवळा आहे असे दाखवण्यात आले परंतु अमळनेर च्यां जनतेला ह्या राजकारणाचा चांगला अनुभव आहे.

दादा कोणता झेंडा घेऊ हाती नव्हे, एकाच झेंडा घ्या हाती… 

मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत कृषिभूषण साहेबराव इतिहास बघितला तर साहेबांनी किती पक्षांची जवळीक आणि दुरावां केला हें आपणास दिसून येईल. मग जनतेच्या मनातला प्रश्न साहेबराव दादा खरंच निष्ठावंत आहेत का.? असाल तर लवकरात लवकर एकाच पक्षांचा झेंडा घ्या हाती.

राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून तिकीट मिळण्याचे चान्सेस आदित्य बिल्डर्स चे प्रशांत निकम यांना जात आहे असे दिसूण येत असल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. 

 

निकम यांना तिकीट मिळाले तर यात गैर काय?? 

मागील काही वर्षात सक्रिय झालेले निकम शिक्षित असुन कंट्रक्शन व्यवसायात तें पारंगत आहेत. सोबतच आधुनिक शेती ह्या विषयात त्यांचा चांगला अभ्यास आहे. तें राजकीय पुढार्‍यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटा यांच्याकडून तिकीट घेऊन अमळनेर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार आहेत. तर त्याचे पक्षाअंतर्गत असलेल्या सर्वेत नाव ही आहे कन्ट्रक्शन व्यवसायाच्या माध्यमातून जनसामान्यांसोबत त्यांचा असलेला तगडा जनसंपर्क सोबतच आर्थिक बाजूही भक्कम असल्याकारणाने त्यांना तिकीट मिळणार असे नाकारता येत नाही. कोरी पाटी असुन समजसमोर एक नवीन चेहरा निकम आहेत हें मात्र खरे. 

यां या पुढार्‍यांची होणार गळच्चीप्पी.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अमळनेर विधानसभा मतदारसंघात स्व:इच्छुक उमेदवार माजी आमदार साहेबराव दादा पाटील राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे उमेश दादा पाटील आणि नुकतीच सुरत येथून आलेले प्रकाश भाई पाटील यांची नावे असताना देखील,

मागून येऊन निकम यांनी पहिली बाजी तर मारली’ असं सध्याचे चित्र आहे. 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!