मदनवाडी ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला
(निलेश गायकवाड)
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते मदनवाडी येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी मदनवाडी गावातील हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील तसेच गटविकास अधिकारी सचिन खुडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मदनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.अश्विनी मारुती बंडगर व उपसरपंच सौ.करिष्मा प्रवीण सवाने यांनी केले होते.
कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर नानासाहेब बंडगर,आदर्श सरपंच तुकाराम बंडगर,माजी सरपंच आम्रपाली बंडगर,ग्रामपंचायत माजी उपसरपंच तेजस देवकाते,माजी उपसरपंच राजेंद्र देवकाते,समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष कुंडलिक बंडगर ,पुणे जिल्हा सरचिटणीस सतीश शिंगाडे,ग्रामपंचायत सदस्य शरद चितारे,ग्रामपंचायत सदस्य शहाजी बंडगर,सतीश सकुंडे,अण्णा ढवळे व सर्कल भाऊसाहेब कोकरे तलाठी व पिडीसी बँकेच्या कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि गावचे ग्राम विकास अधिकारी शेळके व बालविकास अधिकारी मेरगळ व ग्रामस्थ उपस्थित होते.