June 30, 2025 2:36 pm

कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने बोरी नदीवरील फाफोरे बंधाऱ्याचे श्रेय घेऊ नये..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने बोरी नदीवरील फाफोरे बंधाऱ्याचे श्रेय घेऊ नये..
संतोष पाटील. तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी अमळनेर, जिल्हा जळगाव.

अमळनेर: विक्की जाधव.

अमळनेर तालुक्यातून कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी बोरी नदी काठावरील फापोरे कालवा बंधारा हे काम चाळीस वर्षापासून केलं नसुन, सर्व जनतेला ठाऊक आहे, तरी देखील मंत्री महोदय ह्या बंधाऱ्याचे श्रेय घेताय जनतेची दिशाभूल करण्याचा धंदा सद्या तालुक्यात सुरु आहे. हा बंधारा आणि याची सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही मिळून दिली असा ओहा-पोह सद्या तालुक्यात करण्यात येत आहे. असे

संतोष पाटील. तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी अमळनेर, जिल्हा जळगाव. यांनी म्हटले असुन 

मंत्री महोदय सद्या व्यस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचे वारे सूरू झाले असुन तें आता जनतेत येतीलच यात शंका नाही.

तालुक्यातील शेतकरी चिंतेत असताना यांना प्रत्येक योजनेवर आपला फोटो कसा दिसेल तसेच सामान्य जनतेला दिखाऊपणा करण्यासाठी फोटोची जाहिरात मात्र मोठी तरी आम्ही त्यांना सांगू इच्छितो कि आमचे आम आदमी पार्टी जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश पवार सर मालपुर यांनी सुरुवाती पासून शेवटपर्यंत पाठपुरावा करून आणि अमळनेर प्रांत कार्यालय येथे सर्व शेतकरी बांधवांना घेऊन बैलगाडी मोर्चा काढला होता.

आणि शासनाचे लक्ष वेधून हा संपूर्ण बंधारा कशाप्रकारे किती वर्षापासून हा प्रकल्प रखडला होता, त्यासाठी आम आदमी पार्टी अमळनेर च्यां पदाधिकाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. हे संपूर्ण तालुक्याने बघितलं आहे. आणि बारा गावांच्या सरपंच सहित सर्वांनी यात आपली महत्वाची भूमिका बजावली असून कुठल्याही राजकीय नेत्यांनी हा बंधारा आम्ही केला आम्ही पाठपुरावा केला असं सांगू नये करण यें जनता हैं साहब जनता सब जाणती हैं.
संतोष पाटील. तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी अमळनेर, जिल्हा जळगाव.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!