June 29, 2025 5:29 pm

विधानसभा निवडणुकीत पाडळसे धरणाचे गाजर दाखवू नका.

अपनी भाषा में पढ़े! Translate

विधानसभा निवडणुकीत पाडळसे धरणाचे गाजर दाखवू नका.
प्रा अशोक पवार
निम्न तापी प्रकल्पाचे , पाडळसे धरणाचे काम गेल्या 26 वर्षापासून सुरू आहे 142 कोटी किंमत असलेले पाडळसे धरण आज 5000 कोटी किंमतीचे झाले आहे . हा सर्व जनतेचा पैसा आहे. धरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, दरवर्षी पाचशे कोटी रुपये पाडळसे धरणासाठी आर्थिक तरतूद केली तरच धरण दहा-पंधरा वर्षात पूर्ण होऊ शकते एवढा निधी महाराष्ट्र राज्याचा जलसंपदा विभाग देऊ शकत नाही त्यामुळे राज्याच्या निधीतून धरण होणे कठीण व अशक्य आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान जलसिंचन योजनेत पाडळसे धरणाचा समावेश अजून झालेला नाही परंतु त्या दृष्टीने भेटीगाठी सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडे पडून आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय पाडळसे धरण होऊच शकत नाही .त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पाडळसे धरणाचे गाजर दाखवून मतदारांना वेडे बनवू नका. नाहीतर मतदार तुम्हाला घेर ल्याशिवाय राहणार नाही. असे परखड मत पाडळसे धरण पुस्तिकेचे लेखक व सामाजिक ,राजकीय जेष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केले. ते नागरिक हित दक्षता समितीच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!