June 29, 2025 12:54 pm

हर्षवर्धन पाटील यांच्या सुसंवाद कार्यक्रमास पाऊस असूनही नागरिकांची मोठी गर्दी! – कुरवली येथे सुसंवाद कार्यक्रम संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांच्या सुसंवाद कार्यक्रमास पाऊस असूनही नागरिकांची मोठी गर्दी!
– कुरवली येथे सुसंवाद कार्यक्रम संपन्न.

(निलेश गायकवाड)

कुरवली (ता. इंदापूर) येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन (भाऊ) पाटील यांच्या गुरुवारी (दि. 25) सकाळी 8 वाजलेपासून कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित सुसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पाऊस असूनही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे विद्यालय परिसर हा नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची सार्वजनिक कामे, विविध प्रश्न, अडी अडचणी जागेवरतीच संबंधितांशी दूरध्वनीवरून संपर्क करून मार्गी लावल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार व मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो, बावडा येथील रत्नाई निवासस्थानी तसेच दुधगंगा दूध संघ या ठिकाणी वेळोवेळी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या सुसंवाद कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त परिसर लाभला आहे. कुरवली येथील सुसंवाद कार्यक्रमास सणसर-लासुर्णे, कळंब-वालचंदनगर या जिल्हा परिषद गटातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!