June 29, 2025 7:20 pm

मा.मंत्री महोदयांना आपली जाहिरात आणि महिलांची खरोखर मदत करायची असेल तर त्यांनी शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी वयक्तिक खर्चातून स्वतःची यंत्रणा उभी करावी. शाम पाटील 

अपनी भाषा में पढ़े! Translate

मा.मंत्री महोदयांना आपली जाहिरात आणि महिलांची खरोखर मदत करायची असेल तर त्यांनी शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी वयक्तिक खर्चातून स्वतःची यंत्रणा उभी करावी. शाम पाटील 

अमळनेर :विक्की जाधव

शुक्रवार १९ जुलै २०२४ रोजी अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने इंदिरा भवन येथे नगरपरिषदेचे कर्मचारी बसवून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना प्रभावशालीपणे राबविण्यासाठी व अर्ज करतांना महिलांना मदत मिळावी म्हणून व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी नामदार अनिल पाटील यांचे फोटो छापून अर्ज वाटप केले जात असल्याची माहिती मला तिथे अर्ज करायला आलेल्या महीलेकडूनच मिळाली आणि ते अर्ज भरून जमा केल्यानंतर कदाचित बाद तर होणार नाहीत ना अशी शंका उपस्थित केली मी त्याठिकाणी जाऊन त्याची माहिती घेतली असता मला देखील त्यात थोडी शंका वाटली

शासनाच्या नियमांचे पालन व तंतोतंत अमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आणि मंत्री महोदयांवर आहे तेच जर अश्या प्रकारे नियम मोडणार असतील तर ही व्यवस्था कशी टिकणार…?

हा सर्व प्रकार ” कुंपणानेच शेत खाण्यासारखा असल्याने ” मी व्हिडिओ बनवून सुरू असलेल्या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी या नात्याने निषेध केला

मा.मंत्री महोदयांना आपली जाहिरात व महिलांची खरोखर मदत करायची असेल तर त्यांनी शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी वयक्तिक खर्चातून स्वतःची यंत्रणा उभी करून केंद्र सुरू करावीत व आपले कार्यकर्ते तिथे बसवावेत पण ते असे करतांना दिसत नाहीत कदाचित त्यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे ते तसे करत नसून नगरपरिषदेची व आशा वर्कर यांची मदत घेत आहेत

आपण महाराष्ट्रातील इतर मतदारसंघात जर बघितले तर अनेक आमदार आपल्या वयक्तिक खर्चातून महिलांना अर्ज करण्यासाठी घरपोच सहकार्य करीत आहेत त्याचे पुरावे देखील आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहोत

मी त्यांची चूक त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ती सुधारणे अपेक्षित असताना ते व त्यांचे काही सहकारी योजनेला विरोध करीत असल्याचा गैरसमज पसरवून चोप देणार असल्याची भाषा करीत आहेत परंतु चोप देण्याची भाषा करणाऱ्यांना माझ जाहीर आव्हान आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!