June 29, 2025 2:24 pm

२८ जुलै ला होणार अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

२८ जुलै ला होणार अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ. 

अमळनेर : विक्की जाधव.

दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभाचे आयोजन २८ जुलै २०२४ रविवार रोजी सकाळी ८.३० वाजता स्टेट बँक मागे, इंदिरा भवन अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दि.अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचेवतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने इ १० वी व १२ वी यात ८०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात येणार आहे. याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे मार्कशीट ची झेरॉक्स कॉपी बँकेच्या वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांचेशी संपर्क साधून जमा करावेत.
शतक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे , व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!