टोकरेकोळी प्रमाणपत्र मिळण्यासाठी युवकाचे अनोखे आंदोलन तर शासनाला धरले धारेवर
डॉ. अनिल शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
अमळनेर : विक्की जाधव.
येथे आदिवासी टोकरेकोळी समाजाच्या विद्यार्थीना टोकरेकोळी (एसटी) चे शैक्षणिक कामा साठी लागणारे दाखले मिळावेत यासाठी टोकरेकोळी समाजाचे आंदोलक दि. १५ पासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. परंतु यां आंदोलनास ८ दिवस झाले असुन प्रशासन आमच्यांकडे लक्ष देत नाही म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल ऐका आंदोलकाने अनोखे आंदोलन केले.उर्वेश साळुंखे असे त्यां युवकाचे नाव असुन त्याने अमळनेर येथील प्रांत कार्यालयाचे गेटवर बसून लक्षवेधी आंदोलन केले.
या वेळी टोकरेकोळी समाजाचे जगन्नाथ बाविस्कर, मधुकर गरु सोनवणे, प्रवर्तनचे मदन शिरसाठे, हिलाल सैदाणे,रामचंद्र सपकाळे, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, साहेबराव कोळी, सुखदेव सोनवणे, अशोक कोळी, सुभाष रामसिंग,भुषण कोळी, भिमराव कोळी, उखा कोळी, गजानन कोळी, सागर कोळी, सुनील कोळी, वसंत महाराज, यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.