June 29, 2025 12:39 pm

शरद पवारांच्या पापाचा पाढा गावागावात वाचणार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

शरद पवारांच्या पापाचा पाढा
गावागावात वाचणार!
भाजपाचे धुळे जिल्हा चे जिल्हाध्यक्ष श्री.बबनराव चौधरी यांची घोषणा..

केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री असताना आणि महाराष्ट्रात सत्तेवर असताना शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काहीही केले नाहीच, उलट राज्याच्या विकासाला आणि सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचविण्याचीच भूमिका घेऊन महाराष्ट्राचे नुकसान केले. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असून त्यांनी गैरकारभाराला संस्थात्मक प्रतिष्ठा दिली, हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन भाजपचे कार्यकर्ते आगामी काळात राज्यात गावागावात जागर करतील, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री.बबनराव चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात केलेल्या अपप्रचारातील प्रत्येक मुद्द्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या साक्षीने दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युपीए सरकारच्या सत्ताकाळात पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचा पंचनामाही केला जाईल. पवार यांनी पुण्यातील कोणत्याही चौकात येऊन जाहीर चर्चा करावी असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. हिंमत असेल तर पवार यांनी या आव्हानास सामोरे जावे, अन्यथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सारा हिशेब उघड करतील व पक्षाचे कार्यकर्ते तो गावागावात पोहोचवतील असा इशाराही या पत्रकात श्री.बबनराव चौधरी यांनी दिला आहे. दूध भुकटी आयात, साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न शरद पवारांमुळेच टांगणीवर राहिला असून आरक्षणाच्या मुद्द्यावरील शरद पवारांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही श्री.चौधरी यांनी केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!