पाण्याच्या अंदाज न आल्याने गटारीत पडून एका सायकलस्वाराचा मृत्यू.
अमळनेर : विक्की जाधव.
येथील विप्रो कंपनीजवळील असलेलल्या रेल्वे पुलाखाली एका सायकलस्वाराचा पाण्याच्या अंदाज न आल्याने गटारीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल दि 23 रोजी सायंकाळी घडली.
डॉ. अनिल शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
अशोक गिरीधर चौधरी. असे मृत्यू झालेल्याचे नाव असुन तें मूळ नाशिक येथील रहिवाशी असुन सद्या तांबेपुरा येथे राहत होते. काल सायंकाळीच्या सुमारास सायकलीने जातं असताना त्यांचा तोल जाऊन पुलाच्या बोगद्यात असणाऱ्या गटारीत अडकले त्यातच त्यांचा मृत्यू झाला असे समजते.
सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच बघायची गर्दी केली होती. मयताचे ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे शवविच्छेदन करण्यात आले असुन त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार असून प्रताप सुरेश चौधरी यांचे ते मेहुणे होत.