प्रशासकीय भलिमोठी इमारत असून यंत्रसामग्री आणि अभावी मनुष्यबळामुळे पडली धुळखात ;भिगवण ट्रामा केअर सेंटर ची अनोखी प्रेम कहाणी
(निलेश गायकवाड)
लाखो करोडो रुपये खर्चून भिगवन येथील बांधलेली भव्य ट्रामा केअर सेंटरची इमारत धुळखात पडल्याचे चित्र दिसत आहे. नावापुरते मनुष्यबळ नावापुरते साधनसामग्री ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. म्हणजे असं म्हणायचे की “नाव मोठे आणि लक्षण खोटे”. भिगवन चे नागरिक झाले त्रस्त, नागरिकांनी प्रशासनाला उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. येत्या शनिवार 27 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन सर्वसामान्य जनतेचे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. दहा ते बारा पदे रिक्त असल्याचे व यंत्रसामग्री बंद पडून धुळखात पडल्याचे चित्र दिसत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याचे म्हणावे लागेल . भिगवन ट्रामा केअर सेंटरच्या प्रेम कहानी ची दखल घेण्यात यावी यासाठी सर्वसामान्य जनतेची आग्रहाची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन या गोष्टीवर आलेली मरगळ झटकून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कितपत उतरेल हे बघावे लागेल ….