June 28, 2025 9:11 pm

संस्कारातून ज्ञान मिळवा  डी.वाय.एस.पी सुनिल नांदवाळकर यांचे प्रतिपादन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

संस्कारातून ज्ञान मिळवा  डी.वाय.एस.पी सुनिल नांदवाळकर यांचे प्रतिपादन.

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप कॉलेजमध्ये गुरू पौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांचा प्रति आदरभाव व्यक्त करत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमलनेरचे पोलीस उप अधिक्षक सुनिल नांदवाळकर यांनी रस्ते अपघात व स्वतः च्या मालमत्तेचे रक्षण कसे करावे या संबंधी विस्तृतपणे भूमिका स्पष्ट केले.

दिनांक २२ जुलै २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात पार पडलेल्या जण जागृती कार्यक्रमात प्रारंभी प्रताप महाविद्यालयाच्या उपस्थित सर्व प्राध्यापक गुरू जणांचे सत्कार मा.सुनिल नांदवाळकर,पोलीस निरीक्षक विकास देवरे,पोलीस उप निरीक्षक ईंगळे मॅडम,पोलीस कर्मचारी जरे मॅडम,खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक डॉ.अनिल शिंदे,प्राचार्य डॉ.अरुण जैन,यांच्या हस्ते करण्यात आले.

मा.सुनिल नांदवाळकर यांनी गुरुजन व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रामुख्याने पीपीटी द्वारे दोन घटकांवर भर दिले.पहिले,विद्यार्थ्यांनी नेहमी सत्याची कास धरावी व ज्ञानात वृद्धी करावे ,आदर्शवत नागरिक बनावे,रस्ते अपघात टाळण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,१८-३५ वयोगटातील तरुणांनी सावध राहून हेल्मेट सह व्हेहिकल चालवावे,हवामान विषयक घटक समजून घ्यावे,विद्यार्थी दशेत सुद्धा लाल सिग्नल असते त्याची पालन करावे,रिल्स व रेशिंग बंद करावे,अपघात झाल्यानंतर गोल्डन पिरियड मध्ये रुग्णालयात दाखल करावे,स्वतः वचन बद्ध व्हावे.

आपल्या दुस-या पीपीटी सादरीकरणात नांदवळकर साहेब म्हणाले की,आपण स्वतः आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी, आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करू नये,डॉयल ११२ ही नविन सेवा सुरू झाली त्याचा लाभ सर्वांनी घ्यावे अशा विविध प्रकारच्या सूचना व नव माहिती दिली.

या नंतर जेष्ठ संचालक डॉ.अनिल शिंदे यांनी सुद्धा आपण सर्व प्रकारचे भेद विसरून मानवतावादी कार्यास वाहून घेणे आवश्यक आहे असे सांगून उपस्थित सर्व गुरुजना बद्दल आदरभाव व्यक्त केल्या यावेळी अनेक प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले तर

सूत्र संचालन व आभाराचे कार्य उप प्राचार्य डॉ.विजय तुंटे यांनी पार पाडले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!