दौंड शहरातील भाजपा कार्यालयात शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधि – विकी ओहोळ
8446119158
दौंड – जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती दौंड शहर भाजपाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष स्वप्नील शहा व भाजपाचे दौंड शहरातील जुने ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत जगदाळे व बाळासाहेब कोळी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमामध्ये दौंड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत जगदाळे व बाळासाहेब कोळी यांचा सन्मान करण्यात आला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .बाळासाहेब कोळी यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास दौंड शहर अध्यक्ष स्वप्नील शहा, सरचिटणीस योगेश डाबी, रवींद्र बंड युवा मोर्चा अध्यक्ष ओंकार कड्डे उपाध्यक्ष जान्हवी ताई चोळके, चिटणीस मनिषाताई नेर्लेकर हर्षाली अग्रवाल,रिया रामदासांनी, राजश्रीताई जोगळेकर ,मीरा साहेब म्हेत्रे परीक्षेत पुरंधरे, देवेन मंत्री जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे नेते फिरोज खान प्रकाश पारदासानी आणि ओबीसी अध्यक्ष मीनलताई निंबोळे तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.