बारामती मध्ये ‘जीवनबाग’ प्रकाशित..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती मध्ये ‘जीवनबाग’ प्रकाशित..

बारामती (प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)

नवोदित कवयित्री अनिता रामलिंग ताबे यांच्या ‘जीवनबाग’ या स्वलिखीत काव्यसंग्रह साहित्याचे प्रकाशन शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 7 जुलै, 2024 रोजी बारामती मध्ये करण्यात आले.
अनिता ताबे यांचे कुटुंब व ‘पंचक्रोशी प्रकाशन, होळ, ता- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन सोहळ्या चे आयोजन केले होते. बारामती येथील
‘पाठ्यपुस्तकातील कवी’ म्हणून प्रसिद्ध असणारे कवी हनुमंत चांदगुडे यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सदर प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.अविनाश सांगोलेकर, जेष्ठ गझलकार व माजी मराठी विभागप्रमुख,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यांनी भूषविले. नागपूर येथील जेष्ठ कवी व लेखक, मातोश्री व संताजी प्रतिष्ठान, नागपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ.मधुकर वाघमारे तसेच पुणे येथील उद्योजक व जेष्ठ सहजयोग साधक विठ्ठल निंबाळकर प्रमुख सन्मानित अतिथी म्हणून या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी कवयित्री सौ. अनिता ताबे यांचे स्नेही, आप्तेष्ट यांच्या सह साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान कला, विद्यान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील मराठी विभागाचे प्रमुख डॉ.श्रीराम गडकर, डॉ.सलीम बागवान तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. विजय काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.प्रकाशन सोहळ्या सह काही निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन देखील यावेळी पार पडले.आपले काव्य सादर करणार्‍या सर्व कवींचा पुष्प व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन शब्दरत्न शुभांगी जाधव, पंचक्रोशी प्रकाशन चे बाळासाहेब करचे यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी जाधव व प्रास्ताविक अनुप्रिता डांगे यांनी तर आभारप्रदर्शन रामलिंग ताबे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!