एका निर्णयाने शरद पवार यांना दिलासा तर माजी आमदार साहेबराव दादा पाटील अमळनेर विधानसभा मतदारसंघात वाजवणार तुतारी चर्चेला उधान
अमळनेर : विक्की जाधव.
मागील काही दिवसात मतदारसंघातून अचानक गायब झालेले कृषिभूषण साहेबराव पाटील हे गेल्या काही दिवसात शरद पवार यांची भेट घेतील असे अमळनेर तालुक्यात चर्चाला उधाण आले आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आगामी विधानसभा निवडणुकीत अमळनेर मतदार संघात कोण उमेदवार तुतांरी वाजवणार हे जरी अजून नक्की नसले तरी एक- दोन नव्हे तर तीन- तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तिकीट घेण्यास इच्छुक आहेत. सध्या मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे
मंत्री असले अनिल पाटील यांनी अजित पवार यांच्या सोबत जाऊन राष्ट्रवादीमधून बंड करुन भाजपा व शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली होती.
त्यानंतर काही दिवसांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हटले होते की,
“पुढच्या विधानसभेत अनिल पाटील दिसणार नाहीत असे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते.
व आता मागील काही दिवसांपासून माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील शरद पवार गटाकडून अमळनेर मतदार संघात तुतारी फुंकावी अशी इच्छा ऐका व्हायरल पत्राद्वारे केली आहे अशा अश्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली असल्याने यां निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह निश्चित झाले असुन यात राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,
माजी आमदार साहेबराव पाटील आणि नवीनच अमळनेर विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे प्रकाश भाई पाटील यांचेही नाव समोर येत आहे.
प्रतिक्रिया.
2014 मध्ये ज्या जनता जनार्दनाने मला अमळनेर मतदार संघामधून निवडून आणले. त्या जनता जनार्दनासाठी मी कोणाचे पाय धरण्यास तयार, तर अपक्ष जरी राहिलो तरी जणते साठीचं.
कृषीभूषण साहेबराव पाटील.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसही वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचं आता हेच चिन्हं असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी ही स्वीकारता येणार आहे. निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यता पक्षाला दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे.