June 28, 2025 6:50 pm

माळेगाव बुद्रुक येथे संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे होणार जंगी स्वागत…

अपनी भाषा में पढ़े! Translate

माळेगाव बुद्रुक येथे संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे होणार जंगी स्वागत…

बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ऐतिहासिक माळेगांव नगरी सज्ज झाली असून सर्व नागरिकांनी स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन पालखी स्वागत सोहळा प्रमुख अमित तावरे यांनी केले आहे.
संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा आज सोमवार रोजी माळेगांव मुक्कामी येत आहे.या पार्श्वभूमीवर नगर पंचायतीच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी केली आहे. माळेगावात पालखीचे दुसरे गोल अश्व रिंगण होणार आहे.
पालखी विसाव्यासाठी भव्य शामियाना उभारला गेला आहे.तसेच गोल रिंगणासाठी मैदान तयार करण्यात आले आहे.अत्यंत भव्य दिव्य असे स्वागत करण्यात येणार असुन सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमित तावरे यांनी केले आहे.
दरम्यान पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण देखील सज्ज असुन विविध सामाजिक मंडळे, पतसंस्था, महिला बचत गट आदी वैष्णव भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!