November 24, 2024 4:50 pm

केरकचरा टाकण्याच्या वादातून एकास मारहाण पोलिसांत गुन्हा दखल.

अपनी भाषा में पढ़े! Translate

केरकचरा टाकण्याच्या वादातून एकास मारहाण पोलिसांत गुन्हा दखल.

अमळनेर : विक्की जाधव. 

केरकचरा टाकण्याच्या वादातून एकास मारहाण पोलिसांत गुन्हा दखल यासंदर्भात अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील एकरुखी येथे येथील एकनाथ झुलाल पाटील आणि समाधान रोहिदास पाटील यांच्यात सकाळी केर कचरा टाकण्यावरून बाचाबाची झाली, दरम्यान समाधान रोहिदास पाटील हा कचरा टाकत असतांना त्यास एकनाथ पाटील यांनी शिवीगाळ केले. याचा राग आल्याने समाधान याने ही शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावेळी समाधान च्या मदतीला त्याचा भाऊ रोहिदास आसाराम पाटील, अनिल धर्मा पाटील, भरत वामन पाटील, आणि त्यांची आई सरलाबाई रोहिदास पाटील हे धावून आल्याने त्यांनी लोखंडी सळई, चापटाबुक्क्यांनी एकनाथ पाटील यांना मारायला सुरुवात केली. यावेळी एकनाथ पाटील यांची पत्नी व दोन सुना या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता

त्यांना देखील मारहाण करण्यात आली. गावकर्यांच्या मदतीने एकनाथ पाटील यांना त्यांच्या तावडीतून सोडविले व पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मारहाण प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!