June 29, 2025 7:40 am

सरळ सेवेतून रिना माळी हिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड 

अपनी भाषा में पढ़े! Translate

सरळ सेवेतून रिना माळी हिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड

 

अमळनेर विक्की जाधव.

तालुक्यातील कु.रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी ता.चोपडा येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पदी निवड झाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कु. रिना माळी हिचे शिक्षण प्राथमिक शिक्षण कळमसरे ता अमळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर इयत्ता दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण शारदा माध्यमिक विद्यालयात कळमसरे येथे,होऊन उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण प्रताप महाविद्यालयात झाले. रिना माळी हिने बी. एस .सी .व एम एस. सी. मायकोबाँलायजी प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेऊन धुळे येथील विदयासागर ईंनसट्युट , येथे पी जी . डी .एम.एल .टी. करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु असतांना सरळ सेवा अंतर्गत डिसेंबर 2023 मध्ये ह्या पोस्टची परीक्षा तिने दिली होती. यात तीला यश मिळाले असून तिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया म्हणून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवड झाली आहे.
रिना ही मधुकर यशवंत माळी यांची कन्या आहे. तिने हे यश मिळविल्याने यावेळी तिचे वडील व आई यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. कु. रिना हिला तिचे काका एल आय सी एजंट,व पत्रकार बाबुलाल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रिना माळी यांच्या या स्पर्धा परीक्षे अंतर्गत निवड झाल्याने कळमसरे ग्रामस्थ व तालुक्यातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!