June 30, 2025 12:46 am

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातुन घेतले ताब्यात. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातुन घेतले ताब्यात. 

अमळनेर : विक्की जाधव

तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी प्रकरणातील गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथून अटक केली. शहरातील वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना घरफोडी चोरीचे गुन्ह्यांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.  त्यांनी पोलीस पथक तयार करुन अमळनेर शहर व तालुका परिसरातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला असुन यात सावखेडा. तां. अमळनेर येथील घरफोडी करणारा आरोपी किरण तुकाराम बारेला (सोलंकी) वय २७ मुळ रा. दुदखेडा ता. सेंधवा जि. बडवाणी हा टाकळी ता. चाळीसगांव येथे असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेत आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्यास सावखेडा (ता. अमळनेर) येथील घरफोडी बाबत विचारणा करत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचेवर संशय आला म्हणून पथकाने त्यास ताब्यात घेवून सविस्तर विचारपूस करता त्याने सुमारे ५ महिण्यापुर्वी सावखेडा गावी घरफोडी केल्याचे माहिती दिली आहे. याप्रकरणी
अमळनेर पोलीसात गुन्हा दखल आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!