बारामतीचा नवा दादा.. युगेंद्र पवार
बारामती (सह-संपादक संदिप आढाव)
नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली.संपुर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत खा.सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद भावजय मधे टफ लढत झाली अन् खा.सुप्रिया सुळे यांचा चौथ्यांदा पुन्हा खासदार झाल्या.
हि निवडणूक फार चुरशीची झाली.कारण राष्ट्रवादी पक्षात फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाशी संधान साधले आणी पवार साहेब एकटे पडले.यामुळे मित्र पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबदबा असल्याने सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात होता.
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय केवळ मतदारांना नव्हे तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना पटला नाही.यामुळे सर्व कुटुंब अजित पवार यांच्या विरोधात गेले.खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी स्वतः खा.शरद पवार,प्रतिभा पवार,आ.रोहित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार आणी विशेषतः युगेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन खा.सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका बजावली.
या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण तालुक्यात खा.शरद पवार,खा.सुप्रिया सुळे यांनी गावोगावी जनसंवाद मेळावा आयोजित करुन आभार दौरा केला आहे.सर्वच गावात त्यांना अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला आहे.
हा मेळावा आयोजित केला जात असतानाच सर्वांच्याच चर्चेत एक अग्रगण्य नाव म्हणून युगेंद्र पवार सध्या सर्वांच्या तोंडी पहावयास मिळत आहे.खरे तर लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे एकाकी पडले होते.तरी ही सर्व सामान्य जनता व कुटुंबातील व्यक्तींनी मनापासून साथ दिल्याने विजय मिळवता आला.
मात्र सध्या युगेंद्र पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.कारण तालुक्यातील प्रत्येक सभेत साहेबांच्या सोबत युगेंद्र पवार सहभागी झाल्याचे दिसून आले.
दुसरी नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे खा.शरद पवार यांच्या ताफ्यात वाढऱ्या गाड्या अधिक असल्याने त्याची ही वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे.यामुळे शरद पवार अधिक जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.
दरम्यान प्रत्येक गावात अन् युवकांच्या तोंडी युगेंद्र पवार यांचे नाव घेतले जात आहे. प्रत्येक सभेत त्यांच्या नावाचा जयघोष करीत उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे.
एकीकडे बारामतीचा दादा बदलाच्या चर्चा चालू असताना नकळत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांची बारामती विधानसभा निवडणुकीत लढत झाली तर नवल वाटायला नको.. एकंदरीत बारामतीचा नवा दादा म्हणुन युगेंद्रची सरशी होणार का? हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल.