November 24, 2024 6:46 am

बस स्टँड परिसरात प्रवासी महिलेची 36 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लांबवले.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बस स्टँड परिसरात प्रवासी महिलेची 36 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लांबवले.

दिवसा बस स्टॅन्ड ला तर रात्री भागवत रोडला होत असतात चोऱ्या.

सी सी टीव्ही असून नसून उपयोग नाही, तर पोलीसांचा धाकही  चोरट्याना राहिला नाही, शहरात चोरट्यांचा धुमाकूळ 

अमळनेर : विक्की जाधव.

काही दिवसांपूर्वी शहरातील भगवतं रोड वरील चार दुकाने फोडण्यात आली होती. त्यांनतर धुपी, मुंदडा नगर व विद्यानगर भागात चोरट्यानी  घरे फोडली होती, शहरात चोरट्याची मोठी टोळी सक्रिय असू पोलिसांचा त्यानां धाक राहिलां नाही असे जन-माणसातून बोललेले जातं आहे.

काल भर दुपारी बस स्टँड परिसरात प्रवासी महिलेची 36 हजार रुपये किमतीची मंगळ पोत  गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लांबवली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की राजाराम चव्हाण पत्नी आणि त्यांची मुलगी असा सहपरिवार ह्या २० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुऱ्हाणपूर – शिर्डी बस (क्र. एम एच १४ बी टी २२०४) मध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने गळयातील १२ ग्रॅम वजनाची ३६ हजार किमतीचे मंगळपोत काढून घेतली. तर मुलगी वैशाली बडगुजर हिच्या पर्समधून ६ हजार रुपये रोख व बँकेचे एटीएम चोरीला गेल्याचे समजून आले  याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर

पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून

पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!