June 29, 2025 4:43 am

प्रताप कॉलेजचा वर्धापन दिन संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप कॉलेजचा वर्धापन दिन संपन्न..

अमळनेर : विक्की जाधव..

खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर चा 79 वा वर्धापनदिन 20 जून रोजी  संपन्न झाला.

श्रीमंत,दानशूर,कर्मयोगी प्रताप शेठजी यांनी खानदेश भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन खानदेश शिक्षण मंडळाची स्थापना केली.गरीबांसाठी रुग्णालय,अध्यात्मिक श्रद्धे करिता श्रीराम मंदिर,वैचारीक चिकित्सा व संशोधनासाठी प्रताप तत्वज्ञान केंद्र यासह 20 जून 1945 रोजी प्रताप महाविद्यालयाची स्थापना केली.या नामांकित संस्थेत वाराणसी,नागपूर,पुणे,औरंगाबाद, अहमदनगर अशा विविध ठिकाणाहून आलेल्या तज्ञ प्राचार्य व अनुभवी शिक्षकांनी उत्तम सेवा दिली.या संस्थेत यशाची उज्वल परंपरा आजही कायम आहे.गुणवत्ता टिकविणे हे सूत्र कार्याच्या केंद्रस्थानी आहे.प्रताप महाविद्यालयास आज 79 वर्ष पूर्ण झाले आहेत यावेळी दानशूर प्रताप शेठजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विदयार्थीनी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!