November 21, 2024 10:40 pm

खान्देश शिक्षण मंडळ संचालकांनी केलेली  बोगस भरती प्रक्रिया राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्षांनी केली रद्द

अपनी भाषा में पढ़े! Translate

खान्देश शिक्षण मंडळ संचालकांनी केलेली  बोगस भरती प्रक्रिया राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्षांनी केली रद्द

याचं निकालाच्या आधारावर गुन्हा होणार दाखल

अमळनेर :विक्की जाधव. ९१७५०५०३००

खान्देश शिक्षण मंडळ ही संस्था २०१६ पासून  बरखास्त होती. तरीही संस्थेच्या प्रताप महाविद्यालयाने २६ जणांची केलेली बोगस भरती तक्रारीवरून रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती खान्देश शिक्षण मंडळाचे १९८६ पासून असलेले सदस्य लोटन चौधरी व माजी चेअरमन दिलीप जैन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

          या प्रकरणाच्या सखोल
चौकशीसाठी १७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आमरण उपोषणास बसण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. कनिष्ठ महाविद्यायात २२ आणि ४ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण २६ जणांची बोगस भरती तेव्हा केली होती.
त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात गेलो असता.

या संदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष यांनी २६ जणांनी मान्यता रद्द केली आहे. यां निकालाच्या आधारावर आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे मागणी करणार आहोत.

सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयातील परिशिष्टावर त्यांची नावे नाहीत. मुलाखतीत उपस्थित उमेदवाराची मुलाखत कोणत्या निकषाने  घेतली या यासंदर्भात कोणत्याही प्रकारची नोंद नाही सह्यांबाबत पुरावे नाहीत. विशेष म्हणजे सर्व विषयांचे गुणदान  अहवाल एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!