आंबाऋषीं टेकडी शिरापती काला होऊन वारी ला होते सुरवात अमळनेरकर प्रसाद महाराज पर्वा करणार पंढरपूकडे करणार प्रस्थान
अमळनेर : विक्की जाधव.
येथील संतश्री सखाराम महाराज संस्थानतर्फे सन १७८५ पासून सुरू झालेली अमळनेर ते पंढरपूर पायी वारी या वर्षीही संत श्री प्रसाद महाराज २३ जून ते १५ जुलै दरम्यान अमळनेरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने संस्थानकडून सुमारे ५७५ किमीच्या पायी वारीचे २४
दिवसांचे काटेकोर नियोजन असते पायीवारीला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी सास्थन अमळनेर – पंढरपूर वारीला सुमारे २३९ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी अमळनेरहून वारकरी
सहभागी होत असतात अमळनेर ते पंढरपूर पायी वारीत वारकरी रोज २५ ते ३० किमी चा चालत प्रवास असतो. पुढे ५० ते ६० वारकरी असुन मागे स्वतः महाराज अनवाणी पायाने चालत असतात.
असा असेल पायीवारीचा दैनंदिन प्रवास
दिंडी तुळशी बागेतून सकाळी ११:३० ला सडावणमार्गे संध्याकाळी पारोळा येथे रात्रीचा मुक्काम असेल २४ रोजी सायंकाळी ६:०० नंतर पारोळाहून निघेल रात्रीचा मुक्काम आडगाव येथे असेल तर २५ रोजी भडगावला संपूर्ण दिवस वारी असुन पाण-सुपाऱ्या असतील २६ रोजी भडगावहून संध्याकाळी नगरदेवळा पोहोचेल. २७ रोजी नेरीला संपूर्ण दिवस पान-सुपाऱ्या असणार २८ रोजी सकाळी नागदहून संध्याकाळी बिलखेडा येथे पोहोचेल. २९ लां वारी नागापूरला पूर्ण दिवस ३० रोजी सकाळी नागापूरहून संध्याकाळी पिशोर
येथे पोहोचेल. १ जुलै रोजी सकाळी पिशोरहून संध्याकाळी चिकालठाणा, राजाराय टाकळी, दौलताबाद, वाळुज रात्री मुक्काम महारोळा, बिडकीण ढोरकीण मार्गे पैठण, शेवगाव, चितळी, पाथर्डी, आष्टी, आरणगाव, रात्री मुक्काम नान्नज, जावळा मार्ग करमाळामाळा, वडशिवणी येथे पोहोचेल. १५ रोजी करकंब, गुरसाळा येथे महाराजांचे भजन होऊन रात्री उशिरा पंढरपुरात
वारी पोहोचेल. जय हरि