करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानीच्या जागृत देवस्थानची प्रचिती अनेक भक्तांना वर्षानुवर्षे येत असल्याने कमलाभवानीच्या दर्शनासाठी शेकडो मैल दूरवरून भक्त दर्शनासाठी येत आहे.
काल वटपौर्णिमेनिमित्त श्रीकमला भवानी देवीची महापूजा
श्री. मोहन गंगुबाई नामदेव शिंदे सेवानिवृत्त कॅप्टन भारतीय सैन्यदल यांनी महापूजा भोगी करून श्री कमलादेवी चरणी अंदाजे रुपये २०००००/~ (दोन लाख.) किमतीच्या चांदीच्या पादुका श्री कमलादेवी चरणी अर्पण केलेल्या आहेत. स्व.गंगुबाई शिंदे व स्व. नामदेव शिंदे त्यांचे आई-वडील असून तेही श्रीकमला देवी मातेचे निसिम भक्त होते. त्यांची इच्छापूर्ती मुलगा मोहन नामदेव शिंदे यांनी केली त्यांचे फार समाधान आहे अशी भावना प्रतिक्रिया मोहन शिंदे यांनी व्यक्त केली आहे. श्री मोहन गंगुबाई नामदेव शिंदे यांचा श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान मंदिर समितीचे सचिव श्री अनिल पाटील यांच्या हस्ते श्री कमलादेवी प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मोहन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे, प्रदीप शिंदे हजर होते तसेचमंदिर समिती विश्वस्त श्री सुशील राठोड श्री राजेंद्र वाशिंबेकर व्यवस्थापक अशोक गाठे तसेच मंदिर पुजारी बापू पुजारी दादासाहेब पुजारी सचिन सोरटे किसन आप्पा सोरटे पुरोहित रविराज पुराणिक रोहित पुजारी धनंजय सोरटे योगेश सोरटे व सर्व मानकरी सेवेकरी भक्तगण सर्व शिंदे परिवार करमाळा उपस्थित होते.