June 29, 2025 4:31 am

१४ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार एकावर मारवड पोलिसात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

१४ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार एकावर मारवड पोलिसात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील खर्दे येथील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत लज्जा येईल असे कृत्य इशारे केल्याने एकावर मारवड पोलिसांत पॉक्सो कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खर्दे येथील १४ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार अधिक माहिती अशी कीं गावातील रवींद्र फुलसिंग सोनवणे हा सदर मुलगी शाळेत जात असताना वाईट नजरेने पाहत असे. दिनांक ३ रोजी सदर मुलगी शौचास जात असताना रवींद्र याने तिचा पाठलाग करत हात पकडला होता. सदर मुलीने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितल्याने ते रवींद्र याला समजावण्यासाठी गेले असता त्याने शिवीगाळ करत धमक्या ही दिल्या होत्या. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी बदनामी होईल या कारणाने विनयभंगाची तक्रार न देता शिवीगाळ केल्याची व धमकी दिल्याची तक्रार ४ रोजी पोलीसात दिली होती.

मात्र रवींद्र सोनवणे यांच्या नातेवाईकांनी पोलीसात तक्रारदिल्याने सदर मुलीने रवींद्र सोनवणे याच्याविरुद्ध वारंवार पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!