कुलरचा शॉक लागून ४२ वर्षीय महिलेचा दुर्दैव मृत्यू..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे ९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कुलरचा शॉक लागून महिलेचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला असुन याप्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जवखेडे येथील दिनेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास योगिता सुनील गोसावी (वय ४२) याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिथे जावून पाहिले असता योगिता ह्या चालू असलेल्या कुलरचा शॉक लागून खाली पडलेल्या होत्या, त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्या कोणतीच हालचाल करत नसल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.