वृक्षमित्र भुषण चौधरी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले वृक्षरोपण
धुळे शहर – श्री भुषण चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही मनमाड जीन परिसर राहत्या घरी मोफत वृक्ष वाटप व निंबाचे १० फुटी वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी अनुप अग्रवाल यांच्या धर्म पत्नी सौ अल्पा अग्रवाल, निसर्ग समिती चे सर्व पदाधिकारी, संपूर्ण मित्र परिवार या सर्वांच्या प्रमुख उपस्थित वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला होता झाडे हे मानव आणि प्राणी यांच्या अन्नाचे स्रोत आहेत . पूर, आग, मातीची धूप इत्यादी नैसर्गिक आपत्ती वृक्ष लागवडीच्या मदतीने कमी करता येतात. झाडे ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत आहेत कारण ते प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात. झाडे अनेक पक्षी आणि प्राण्यांना आणि माणसांनाही आश्रय देतात. यंदा पावसाळ्यात जास्तीत जास्त संख्येने वृक्षरोपण करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भुषण चौधरी यांनी केले . वृक्षारोपांच्या कार्यक्रमात सौ अल्पा अग्रवाल यांनी व निसर्ग समितीचे जिल्हाध्यक्ष डी बी बापू पाटील यांनी वृक्ष संबंधित मार्गदर्शन केले. निसर्ग समितीचे अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे , महाराष्ट्र संयोजक सौ अल्पा अग्रवाल, जिल्हा अध्यक्ष डी बी बापू पाटील, शहरअध्यक्ष ऐच ए पाटील आर आर सोनवणे व कृष्णा शिंदे अनुलोम शहर अध्यक्ष योगेश भाऊ थोरात ,चि प्रथम चौधरी, रुग्ण मित्र प्रशांत माळी व काॅलनीतील महिला भगिनी उपस्थित होते.