June 29, 2025 3:30 am

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेरात केली मोठी कार्यवाही.. वाहनांचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अमळनेरतून केली अटक

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेरात केली मोठी कार्यवाही..

अमळनेर: शहर प्रतिनिधी

वाहनांचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अमळनेरतून केली अटक तिघांनी पाच गुन्ह्यांची कबुली…

पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यातील संशयित आरोपी मनीष ऊर्फ सनी रवींद्र महाजन (वय २०), शरद ऊर्फ टकल्या दिलीप पाटील (वय २३), आणि निखिल संतोष चौधरी (वय

२२) (तिघे रा. अमळनेर) यांना अटक केली असुन अमळनेर शहरात वेगवेगळ्या भागात वाहनांचे सायलेन्सर चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात अमळनेर पोलिस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, कमलाकर बागुल प्रवीण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता अमळनेर येथे आरोपीना अटक केली. त्यांचा अजून एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी (रा. अमळनेर) हा सध्या नाशिक जेलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही संशयितांची चौकशी केली असता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाचही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली आहे. दुचाकी नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!