June 29, 2025 8:15 am

तालुक्यातील आर्डी आनोरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सरपंच निवड प्रलंबित..

अपनी भाषा में पढ़े! Translate

तालुक्यातील आर्डी आनोरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीला ऐनवेळी उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सरपंच निवड प्रलंबित आहे.

अमळनेर : विक्की जाधव..

तालुक्यातील आर्डी आनोरे येथील सरपंच किशोर एकनाथ पाटील व उपसरपंच उषाबाई शिवदास पाटील या दोघांवर वंदना पाटील, वर्षा पाटील, ललिता पाटील, पुष्पाबाई पाटील, नरेंद्र पाटील, बारकू भिल, प्रकाश वानखेडे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

होता. यावर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबरला सभा होऊन ७ विरुद्ध २ मतांनी पारित झाला होता. त्यावर

सरपंच व उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे अपील दाखल केले होते.

मात्र २९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळल्यावर सरपंच व उपसरपंच यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आम्हाला

अविश्वास प्रस्तावावर आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही म्हणू सरपंच निवडीला स्थगिती मागितली होती. दि. १३ मार्च रोजी सरपंच निवड

सभेला सर्व सदस्य असताना उच्च न्यायालयाच्या न्या. एस. जी. मेहरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाल आणि सरपंच निवड प्रक्रियेला स्थगित दिली.

सरकारी वकिलांनी तातडीने तहसीलदारांशी बोलणे करून सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती दिली तहसीलदारांनी मंडलाधिकारी पी. एस पाटील यांना उच्च न्यायालयाचा संदर्भ देत तोंडी आदेशाने सरपंच निवड स्थगित केली आहे. त्यामुळे सरपंच निवड अनिश्चित झाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!